पुणे- मुंबई द्रुगतीमार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मंगळवारी ( दिनांक १० ऑक्टोबर ) दुपारी बारा ते दोन दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिलेली आहे. किलोमीटर ४५ आणि ४५/ ८०० या ठिकाणी ग्रॅंटी उभारण्यात येणार आहे. यासाठी हा दोन तासाचा ब्लॉग घेतला जाणार आहे. तरी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन महामार्ग पोलिसांनी केल आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुगतीमार्गावरील अमृतांजन पूल आणि बोरघाट येथे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅंटी उभारण्यात येणार असून यासाठी १२ ते २ चा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. जड वाहतूक वगळता हलक्या वाहनांनी जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा वापर करावा अस आवाहन महामार्ग पोलिसांनी केल आहे. पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर दररोज लाखो वाहन ये- जा करतात. त्यामुळे हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो.