पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश आलं. त्यानंतर मुंबईच्या दिशेने दोन लेनवर वाहतूक सुरू करण्यात आली. तर तिसऱ्या लेनवर दरड असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
हेही वाचा… पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही
दरम्यान, डोंगरावरील धोकादायक दरड पुन्हा कोसळू शकते. ती दरड काढण्यासाठी आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे.