पुणे : कृती आधारित शिक्षणासाठीची खेळणी, गोष्टींची पुस्तके ते आभासी वास्तव अशा वैविध्यपूर्ण शिक्षण पूरक साधनांचा अनुभव विद्यार्थी आणि पालकांना घेता येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राबाबतची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

जी-२० परिषदेअंतर्गत शिक्षण कार्यगटाची बैठक पुण्यात होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच्या शैक्षणिक साधनांचे, शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा प्रदर्शनात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते.

response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
kolhapur becomes first district to ensure 100 percent cctv coverage in government schools
कोल्हापुरातील शाळांना ‘सीसीटीव्ही’चे कवच ! राज्यातील पहिला जिल्हा, १९५८ शाळांमध्ये यंत्रणा कार्यान्वित
teachers oppose copy free campaign
विश्लेषण : कॉपीमुक्त अभियानातील नव्या निर्णयाला शिक्षकांचा विरोध का?
Skill University , Tuljapur, Symbiosis Skills University ,
तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ होणार, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ करणार तांत्रिक सहकार्य, राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

हेही वाचा – जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर, वाविलाला चिद्विलास रेड्डी देशात पहिला

प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षणसंस्था आणि उत्पादकांची दालने आहेत. युनिसेफ, एनएसडीसी, एनसीईआरटी, नॅशनल बूक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टिम्स्‌‍ डिव्हिजन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, विविध राज्य सरकारांचे शैक्षणिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे. आदर्श बालवाडी विविध भाषांतील पुस्तके, ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपारिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन आणि लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठीची खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, आभासी वास्तव असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.

हेही वाचा – पुण्यातील विविध साहित्यांच्या २० गोडाऊनला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

शिक्षण प्रक्रिया आनंददायी करणे, मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी लेखन, वाचन आणि गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकणे, मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यात वृद्धी करणे, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी पूरक साधनांचा कसा वापर करता येऊ शकतो याची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मिळत आहे. हे प्रदर्शन २२ जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे.

Story img Loader