शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सीओईपीचे माजी विद्यार्थी आशिष अचलेरकर यांनी ८.२५ कोटींची देणगी दिली आहे. या निधीतून दरवर्षी १०० ते १५० गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार असून, सीओईपीला आजवर मिळालेल्या देणग्यांतील ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे.

हेही वाचा >>>फुकट काजूकतली दिली नाही; पुण्यात दुकानदारावार गोळी झाडण्याचा प्रयत्न

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Pakistani fan 3 crore gifts for mika singh
भारतीय गायकाचे दिलदार पाकिस्तानी चाहते, भर मंचावर दिल्या ‘इतक्या’ कोटींच्या भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ

आशिष अचलेरकर यांचे अचरेलरकर फाऊंडेशन आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत ८.२५ कोटींची (१ मिलियन अमेरिकन डॉलर्स) देणगी सीओईपीला देण्यात आल्याची घोषणा बुधवारी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे मोहित गुंदेडा, सुरुची वाघ, प्रा. सुजीत परदेशी, प्रा. सुधीर आगाशे आदी या वेळी उपस्थित होते. आशिष सीओईपीतून २००० साली उत्तीर्ण झाले. सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या आशिष यांची ‘नीअरयू’ ही कंपनी आहे. प्रा. सुतावणे म्हणाले, की आशिष यांनी दिलेली देणगी ही सीओईपीला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. या देणगीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मदत होऊ शकेल. माजी विद्यार्थी करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. या देणगीमुळे अनेक माजी विद्यार्थ्यांना पुन्हा सीओईपीशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळेल.

हेही वाचा >>>पुणे:‌ श्वानांच्या भांडणावरुन मालकांमध्ये जुंपली; श्वानाच्या पट्ट्याने एकास बेदम मारहाण

माजी विद्यार्थी संघटना तीन वर्षांपूर्वी नव्याने कार्यान्वित केली. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याचे प्राध्यापकांकडून कळले. त्यातून स्टुडंट सपोर्ट क्लबची कल्पना पुढे आली. स्टुडंट सपोर्ट क्लबच्या माध्यमातून परदेशात कार्यरत असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी मदत केली. दोन वर्षे विद्यार्थ्यांना मदत केली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत शंभर कोटींचा निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन आणि लॅपटॉप यांची चिंता करावी लागणार नाही, असे मोहित गुंदेचा यांनी सांगितले.कोट सीओईपीतील महत्त्वाच्या उपक्रमासाठी माझ्या परीने हातभार लावता आल्याचा आनंद आहे. शिक्षण हा माणसाच्या उन्नतीचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. आर्थिक योगदान हाच मदतीचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे ही देणगी ही केवळ सुरुवात आहे. विद्यार्थ्यांना अन्य काही अडचणी असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे.– आशिष अचलेरकर, माजी विद्यार्थी