पुणे : मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चिड रेसीडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे.

Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
young man killed with cement block in Kondhwa after drinking argument on Monday
दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून, कोंढव्यातील घटना
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार

हेही वाचा – पिंपरी : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असलेल्या गृहनिर्माण संस्थांचे नळजोड तोडण्याच्या कारवाईला विरोध; नागरिकांनी ‘दिला’ हा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट याच्याशी वाद झाला. भोसले आणि त्यांचा भाचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरुन मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. आरोपी सकट आणि साथीदारांनी मोटारचालक भोसले आणि अथर्व याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भोसले यांच्यावर शस्त्राने वार केले. अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – पिंपरी : मोशीत आजपासून देशातील मोठे कृषी प्रदर्शन; अत्याधुनिक उपकरणे पाहायला मिळणार

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

Story img Loader