पुणे: कोरियन पर्यटक तरुणीशी गैरवर्तन केल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. एका तरुणाने गैरवर्तन केल्यानंतर कोरियन तरुणीने तेथून पळ काढल्याचे ध्वनिचित्रफितीत आढळून आले. मात्र, संबंधित कोठे घडली, याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरियन तरुणीसोबत छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्या खांद्यावर हात टाकून गळा आवळल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. संबंधित ध्वनिचत्रफितीत तरुण मराठीत बाेलत आहे. परदेशी पर्यटक तरुणीशी गैरवर्तन केल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा… ‘ज्ञानवापी’च्या इतिहासावर आधारित पुस्तक लवकरच

अतिथी देवो भव यानुसार त्यांचे स्वागत भारताच्या कानाकोपऱ्यात केलं जातं. असं असलं तरी कोरियन ब्लॉगर तरुणीसोबत पिंपरी- चिंचवड शहरातील तरुणाने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. नेमका हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील कुठल्या भागातील आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. ऐन दिवाळी सणादरम्यान कोरियन ब्लॉगर असलेली तरुणी शहरात आली होती असं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. यासंबंधी आता पिंपरी-चिंचवड पोलीस तपास करत असून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a young korean tourist being abused by an indian man has gone viral on social media pune print news rbk 25 dvr