पुणे: कापूरहोळ-सासवड रस्त्यावर ट्रक आणि मोटारीची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात महिलेसह मोटारचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अपघातात दोन वर्षांच्या बालकासह दोघे जखमी झाले. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.
गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (वय २८, रा. किकवी, ता. भोर), तृप्ती अक्षय जगताप (वय २६, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

अपघातात तृप्ती यांचा दोन वर्षांचा मुलगा कृष्णा, प्रकाश बाबुराव दरेकर (रा. धावडी, ता. भोर) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

हेही वाचा… स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आणि….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती यांचे माहेर भोर तालुक्यातील किकवी गावात आहे. त्या दोन वर्षांचा मुलगा कृष्णा याच्यासह माहेरी आल्या होत्या. गणेश हडपसर भागातील एका खासगी कंपनीत कामाला होते. शनिवारी सकाळी ते कामावर निघाले होते. तृप्ती सासरी निघाली होती. गणेश यांच्या मोटारीतून तृप्ती, दोन वर्षांचा मुलगा कृष्णा, नातेवाईक प्रकाश सासवडकडे निघाले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील देवडी गावाजवळ भरधाव मोटार आणि ट्रकची समाेरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरात होती की मोटारीचा चुराडा झाला. अपघातात मोटारचालक गणेश, तृप्ती यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहायाने ट्रकखाली अडकलेली मोटार बाहेर काढण्यात आली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

आईचे छत्र हरपले

तृप्ती जगताप यांचा दोन वर्षांचा मुलगा कृष्णा मांडीवर बसला होता. अपघातानंतर तो फेकला गेल्याने बचावला. त्याला दुखापत झाली आहे. बालपणीच आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader