दूध वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मांजरी भागात घडली. अन्नपूर्णा उर्फ सुमन विजय पाटील (वय ४२, रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे: वारजे भागात ज्येष्ठ महिलेची फसवणूक

दुचाकीस्वार विजय पाटील आणि त्यांची पत्नी सुमन रविवारी दुपारी एकच्या सुमारास मांजरी-महादेवनगर रस्त्याने जात होते. त्या वेळी भरधाव वेगाने पाठीमागून टँकर येत होता. अरुंद रस्त्यावर वळणावर दुचाकीस्वार विजय यांचे नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार विजय तोल जाऊन पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या धडकेने सहप्रवासी अन्नपूर्णा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मांजरी-महादेवनगर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.