पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर परिसरात मालवाहू ट्रकची डाॅक्टर दाम्पत्याच्या मोटारीला धडक दिली. अपघातात डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. अपघातात डॉ. सोनाली यांचे पती डॉ. मच्छिंद्र (वय ४२) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रकचालक पवन भगवान साठे (वय २५, रा. किनी, जि. बुलढाणा) याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कैलास बाळासाहेब बांदल यांनी या संदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरे यांचे शिक्रापूर परिसरात खैरे हॉस्पिटल आहे. खैरे दाम्पत्य पुणे- नगर महामार्गावरुन मोटारीतून निघाले होते. महामार्गावर शिक्रापूरमधील साई सहारा पेट्रोल पंपावर त्यांनी मोटार थांबविली. पेट्रोल भरुन ते परतत होते. त्या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. मोटारीतील आसनावर बसलेल्या डॉ. सोनाली गंभीर जखमी झाल्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>पुणे: पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने; पोलीस महासंचालकांची माहिती

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी
Payal Tadvi Suicide, Accused, Head of Nair Hospital,
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयाच्या तत्कालीन विभागप्रमुखांना आरोपी करा, सरकारी पक्षाची विशेष न्यायालयाकडे मागणी
policemans wife committed suicide by hanging herself in Swargate Police Colony on Friday
पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या- स्वारगेट पोलीस वसाहतीतील घटना

अपघातात गंभीर जखमी झालेले डॉ. मच्छिंद्र यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉ. खैरे यांचा शिक्रापूर परिसरात जनसंपर्क चांगला आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सोनाली यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Story img Loader