पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर परिसरात मालवाहू ट्रकची डाॅक्टर दाम्पत्याच्या मोटारीला धडक दिली. अपघातात डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. अपघातात डॉ. सोनाली यांचे पती डॉ. मच्छिंद्र (वय ४२) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रकचालक पवन भगवान साठे (वय २५, रा. किनी, जि. बुलढाणा) याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कैलास बाळासाहेब बांदल यांनी या संदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरे यांचे शिक्रापूर परिसरात खैरे हॉस्पिटल आहे. खैरे दाम्पत्य पुणे- नगर महामार्गावरुन मोटारीतून निघाले होते. महामार्गावर शिक्रापूरमधील साई सहारा पेट्रोल पंपावर त्यांनी मोटार थांबविली. पेट्रोल भरुन ते परतत होते. त्या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. मोटारीतील आसनावर बसलेल्या डॉ. सोनाली गंभीर जखमी झाल्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा