पुणे : सोसायटीच्या आवारात वाहन लावण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका तरुणाने डाॅक्टर महिलेच्या घरात शिरून तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणाने डाॅक्टर महिलेला शिवीगाळ करून तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हडपसर भागातील ससाणेनगर येथील साई निवास सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी तरुणासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर महिला आणि आरोपी एकाच सोसायटीत राहायला आहेत. आरोपी तरुणाने डाॅक्टर महिलेची गाडी पार्किंगमधून काढली होती. त्यानंतर तक्रारदार महिला विचारणा करण्यासाठी तरुणाच्या आईकडे गेली होती. त्यावेळी आरोपी तरुणाने आणि त्याच्या आईने तक्रारदार महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – पुणे : शंभर दिवसांत दुप्पट परताव्याच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

आरोपी तरुणाने तक्रारदार महिलेच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तिला शिवीगाळ करून तरुणाने अश्लील वर्तन केले. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman doctor was attacked with a weapon due to a dispute over parking a vehicle in the society pune print news rbk 25 ssb
Show comments