पुणे : डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर महिला शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे. आरोपींनी डॉक्टर महिलेला समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

हेही वाचा >>> कामशेत रेल्वे स्थानकाच्या आवारात तरुणाचा खून, आरोपी अटकेत

समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी संदेशाव्दारे दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते. सुरुवातीला डॉक्टर महिलेला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले. सायबर चोरट्यांनी आणखी पैसे देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांना वेळोवेळी आमिष दाखवून त्यांच्याकडून २३ लाख ८३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.