पाळीव श्वान भुंकल्याने झालेल्या वादातून महिलेला शिवीगाळ करुन धमकी दिल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारात ही घटना घडली.या प्रकरणी गोकुळ कदम (रा. तारा हाईट्स, कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>जलतरण तलावांतील दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करा; लोणावळ्यातील बंगले मालकांच्या बैठकीत पोलिसांचे आदेश
तक्रारदार महिलेचे पाळीव श्वान कदम याच्या अंगावर भुंकले. त्या वेळी कदमने त्याला मारण्यासाठी वस्तू उचलली. महिलेने सदनिकेतील खिडकीतून डोकावून पाहिले आणि ती साेसायटीच्या आवारात गेली. तिने कदमला समजावून सांगितले. तेव्हा कदमने महिलेला शिवीगाळ केली; तसेच तिला धमकी दिली. महिलेशी अश्लील कृत्य करणे; तसेच धमकावल्या प्रकरणी कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चवरे तपास करत आहेत.