बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेला साडेआठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एका महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पुणे-सातारा रस्ता परिसरात राहायला असून त्या नोकरीच्या शोधात आहेत. श्रद्धा आणि रिधीमा नावाच्या महिलांनी तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. नामवंत खासगी बँकेत नोकरीची संधी असल्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. त्यानंतर महिलेला वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरण्यास भाग पाडले. महिलेने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने आठ लाख ४० हजार रुपये आरोपी महिलांच्या खात्यात जमा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, नोकरी न मिळाल्याने तक्रारदार महिलेने आरोपी महिला श्रद्धा आणि रिधीमा यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा पैसे न भरल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी तक्रारदार महिलेला देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करत आहेत.