पुणे: औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण (म्हाळुंगे) मध्ये महिलेच्या गळ्यावर वार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिस कर्मचारी हनुमंत वसंत बांगर यांनी फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: ‘भाज्यपाल हटावो, महाराष्ट्र बचावो’, पुण्यात डमी राज्यपाल आणत राष्ट्रवादीचे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण (म्हाळुंगे)च्या खराबवाडी येथील वाण्याचा मळा येथे झुडुपात २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून डोक्यात दगड घालण्यात आला आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली असून अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अज्ञात आरोपीचा शोध गुन्हे शाखा युनिट तीन आणि म्हाळुंगे पोलिस घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman was killed and stoned in the head in chakan mhalunde tmb 01 kjp