लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: ज्येष्ठांची देखभाल करणाऱ्या महिलेने साडेतीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना पाषाण भागात घडली. या बाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने आई-वडिलांची शुश्रृषा करण्यासाठी एका महिलेला ठेवले होते.
महिलेने साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार घरकाम करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचे आई-वडील पाषाण-बाणेर रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांची काळजी आणि देखभाल करण्यासाठी आरोपी महिलेला ठेवण्यात आले होते.
हेही वाचा… भारत गौरव यात्रेत महाराष्ट्राला नगण्य स्थान; उत्तर, दक्षिण भारतातील धार्मिक, पर्यटन स्थळांवर भर
आरोपी महिलेने आई-वडिलांचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील साडेतीन लाख रुपयांचे दागिने चाेरल्याचा संशय तक्रारदार महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव तपास करत आहेत.