लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: खडकीतील दारुगोळा कारखान्यात कामाला असलेल्या महिलेचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
खडकीतील लष्कराच्या दारुगोळा कारखान्यात (ॲम्युनिशन फॅक्टरी) कामाला असलेली महिला दुपारी चारच्या सुमारास कामावरुन घरी निघाली होती. त्या वेळी तिला एकाने रस्त्यात अडवले. महिलेवर चाकूने सपासप वार केले. आरोपी तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा… पुणे: सिंहगड रस्त्यावर चोरट्यांकडून हवेत गोळीबार; मद्यविक्रेत्याला धमकावून रोकड लुटण्याच्या प्रयत्न
पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. प्राथमिक चौकशीत महिलेचा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.