पुणे : मैत्रिणीला घरी बोलावून मित्रांशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावल्याची घटना धनकवडी भागात घडली. मैत्रिणीने नकार दिल्यानंतर तिच्यावर मैत्रीणीने चोरीचा आळ घेतला. आरोपी मैत्रीण आणि तिच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी तिला धमकावून मारहाण केली. या प्रकरणी मैत्रिणीसह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. धनकवडीतील बालाजीनगर भागात ही घटना घडली असून, एका ३८ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला केअर टेकर म्हणून काम करते. आरोपी महिला तिची मैत्रीण आहे. आरोपी महिलेने मैत्रिणीला रात्री दहाच्या सुमारास घरी बोलावून घेतले. त्या वेळी तिच्याबरोबर आणखी दोघे जण होते. ‘तू या दोघांना खूप आवडतेस. तू त्यांच्याशी शरीर संंबंध ठेव. मी तुला पाच हजार रुपये देण्यास सांगते,’ असे आरोपी महिलेने मैत्रिणीला सांगितले.
हेही वाचा – पुणे : जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस पडली, संपाचा परिणाम
हेही वाचा – पुणे : आरटीओत कामकाज ठप्प; जुन्या निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी आंदोलन
मैत्रिणीने तिला नकार दिल्यानंतर तिच्यावर पैसे चोरीचा आळ घेण्यात आला. मैत्रिणीने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघा आरोपींनी तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मैत्रिणीने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि सदनिकेतून पळ काढला. तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. हवालदार जोशी तपास करत आहेत.