पुणे: बाणेर रस्ता येथील संचार भवन परिसरात एका मोटारचालकाच्या मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी खाली पडले. ‘तुम्हाला काही लागले आहे का?’ अशी विचारपूस सुरू असताना या दोघांनी मोटारच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील मुलगा आणि इतर दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे ) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा… पुण्यातील ‘या’ शाळेत सौर ऊर्जेवरील विद्युत निर्मिती प्रकल्प; दररोज दोनशे युनिट वीजनिर्मिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार कोळेकर हे त्यांच्या मोटारीमधून बाणेर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटारीचा धक्का दुचाकीस लागला. त्यामुळे गाडीवरील तरुण आणि तरुणी खाली रस्त्यावर पडले. त्यांना काही लागले आहे का? अशी विचारपूस करण्यासाठी कोळेकर यांनी मोटार थांबवून त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तक्रारदारांची कॉलर पकडून त्याच्या अजून दोन साथीदारांना बोलावून घेतले. तक्रारदार यांच्या मोटारीची किल्ली घेऊन त्यांनी मोटार जबरदस्तीने चोरी करून पळवून नेली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man and women cleverly took away the car after hitting it with their two wheeler in baner pune print news vvk 10 dvr