पिंपरी चिंचवड : प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. प्रतीक संतोष कुतवळ(वय -२० ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या प्रथमेश महादू पठारेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना २५ मे २०२२ रोजी घडली असून तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष जालिंदर कुतवळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : लोणावळा : महिलेच्या पिशवीतून दीड लाखांचा ऐवज लंपास

shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
producer k p chowdary dies by suicide in goa
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या प्रतीकचे मैत्रिणीवर प्रेम होते. या प्रेम संबंधावरून आरोपी प्रथमेश पठारेने प्रेयसीसमोर प्रतीकला मारहाण केली होती. ही घटना भोसरी शास्त्री चौक येथे घडली होती. आपल्या प्रेयसी समोरच मारहाण झाल्याने प्रतीकला ही बाब जिव्हारी लागली, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होते. अपमानीत झालेल्या प्रतीकने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली . आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी प्रथमेश महादू पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Story img Loader