महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. दिनेशकुमार गौड (वय २५, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कचरा वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरिप्रताप यादव (वय ४४, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे : वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून महिलेची एक लाखाची फसवणूक
गौड आणि यादव दोघे मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. दोघे जण सिंहगड रस्ता परिसरात मजुरी करतात. दोघे भाजी खरेदीसाठी सिंहगड रस्ता परिसरात आले होते. भाजी खरेदी करुन दोघे निघाले होते. लक्ष्मी विनायक काॅम्प्लेक्स इमारतीसमोर डंपरने दिनेशकुमारला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव तपास करत आहेत.