पुणे : पावसात आडोशाला थांबलेल्या तरुणाला तारेच्या कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कोंढवा भागात घडली. अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विनोदकुमार फेरारीराम वर्मा (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोदकुमार यांचा मुलगा अजयकुमार कामानिमित्त घरातून बाहेर पडला.

अचानक पाऊस सुरू झाल्याने अजयकुमार कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ थांबला. तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला होता. विनोदकुमार याच्या हाताचा स्पर्श तारेच्या कुंपणास झाला. कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून तो बेशुद्ध पडला. नागरिकांनी बेशुद्धावस्थेतील अजयकुमारला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, तसेच तारेच्या कुंपणात वीजप्रवाह कसा उतरला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते तपास करत आहेत.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Story img Loader