पुणे : कर्वेनगर भागात एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
प्रसाद चंद्रकांत दांगट (वय ३४, रा. वडगाव बुद्रुक) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न, तसेच तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी दांगट याच्या विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दांगट तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याला नकार दिल्याने तो चिडला होता. तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता.
हेही वाचा – पुणे : लष्करातील स्वयंपाकीकडून बालिकेवर अत्याचार
दुचाकीस्वार तरुणीचा पाठलाग करून तिला धमकावले होते. तू विवाह कसा करते, अशी धमकी त्याने दिली होती. त्याने चाकूने पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.