टिळक रस्त्यावर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सराईतास विश्रामबाग पोलिसांनी अटक एका आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांत गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस

मनोज प्रकाश पळसकर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साथीदार प्रेम मोघे, मयूरेश उर्फ पोपट दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव प्रकाश शिंदे (वय २६, रा. दीपज्योती काॅलनी, कर्वेनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिंदे याने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे आणि आरोपी पळसकर, मोघे, दळवी ओळखीचे आहेत. पळसकर सराइत आहे. टिळक रस्त्यावरील टपाल कार्यालयाजवळ मध्यरात्री आरोपी आणि शिंदे थांबले होते. त्यावेळी शिंदेने मोघेला घरी सोडण्यास सांगितले.

हेही वाचा- खडकी बाजार परिसरात दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त; तिघे अटकेत; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी बांबूने शिंदेला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला. मारहाणीत शिंदे गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कुंभारे तपास करत आहेत.

Story img Loader