नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. बारक्या जोरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नवी पेठेत राहात होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जोरी आणि त्याच्या मित्रांनी मध्यरात्री पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रात आखाड पार्टी केली. त्यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळला. जोरीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पसार झालेला आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
First published on: 28-07-2022 at 11:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man was found dead in a riverbed in pune pune print news msr