चोर समजून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करुन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. तरुणाला मारहाण केल्यानंतर गेले तीन महिने आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.राजू उत्तम गायकवाड (वय ४५, रा. राजेंद्रनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता भागात गांपातसिंग गोकुलसिंग मेरावी याला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. मारहणीत त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा >>>लोणावळ्यात मास्क सक्ती? खबरदारी म्हणून पर्यटकांनी काळजी घेण्याचे नगरपरिषदेने केले आवाहन…
पोलिसांनी सुदर्शन भेगडे, प्रकाश कंक, सूरज जोगरे, सतीश केमनाळ, विशाल शिंदे, दीपक एवळे, राहुल सरोदे यांना अटक केली होती. आरोपी गायकवाड पसार झाला होता. तो हिंगणे भागात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस शिपाई राकेश टेकावडे यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले.
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, शरद वाकसे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, राकेश टेकावडे आदींनी ही कारवाई केली.