पार्टीला न बोलाविल्याने तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.जीवन किसन शिंदे (वय २१, रा. सोरतापवाडी, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. शिंदे याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अक्षय आरणे, राहुल आरणे, तेजस चौधरी, अजय गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश

शिंदे आणि आरोपी आरणे, चौधरी, गावडे ओळखीचे आहेत. शिंदेने आरोपींना पार्टीला न बोलाविल्याने आरोपींनी सोरतापवाडीतील महादेवनगर परिसरात शिंदेला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

Story img Loader