पुण्यातील सिंगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सिंहगडावरील कल्याण दरवाजाच्या बुरुजा जवळील कडा कोसळल्याने या तरूम गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. हेमंत धीरज गाला (रा. मित्रमंडळ चौक, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतकरवाडी येथून काल(शनिवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिंहगडाच्या दिशेने ट्रेकिंग स्पर्धेला सुरुवात झाली होती. यामध्ये राज्यातील जवळपास ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये हेमंत गाला हा २२ किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी झाला होता.

सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या जवळ आल्यावर, अचानक तेथील बुरुजाचा कडा कोसळला आणि हेमंत हा दीडशे फुट खोल दरीत जाऊन पडला. या घटनेत हेमंतचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने काढण्यात आल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले.

Story img Loader