पुणे: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय चंद्रशेखर प्रधान (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३१ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे. ती वानवडीतील एका संस्थेत जायची. तेथे तिची प्रधानशी ओळख झाली होती. राजपत्रित अधिकारी असल्याची बतावणी प्रधानने तरुणीकडे केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस भरतीचे आमिष दाखवून प्रधानने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर प्रधानने तिला धमकावून बलात्कार केला. तरुणीला धमकावून त्याने एक लाख ३० हजार रुपये उकळले.

हेही वाचा… पासकेंद्रांवरही पीएमपीची कॅशलेस सुविधा; क्यू-आर कोडद्वारे आजपासून पास विक्री

आरोपी प्रधान याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अन्य उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.