पुणे: जिल्ह्यातील खासदार, आमदार, पुण्याचे माजी महापौर आणि दोन माजी नगरसेवक अशा पाच राजकीय नेत्यांकडे खंडणी मागण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराला यापूर्वीच पकडण्यात आले आहे. तरुणीने विवाहास नकार दिल्याने दोघांनी तरुणीला त्रास देण्याच्या हेतूने तिच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करुन राजकीय नेत्यांना खंडणी मागितल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले असून, यापूर्वी एक उद्योजक आणि तीन राजकीय नेत्यांकडे खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर माहोळ, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे खंडणी मागण्याचा कट रचल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी शाहनवाज गाझीय खान ( वय ३१, रा. गुरूवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार इम्रान समीर शेख याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा…. पुणे: अपघातानंतर मोटारीला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे मोटारचालक महिला बचावली !
शाहनवाजने माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे, तसेच एका उदयोजकासह माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना प्रत्येकी ३० लाख रुपये खंडणी देण्यासाठी दूरध्वनी केले (व्हाॅटसॲप काॅल) होते. राजकीय नेत्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी चार स्वतंत्र गु्न्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आता या दोघांनी आणखी पाच जणांकडे खंडणी मागण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा…. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप गाण्याचं शूटींग, रॅपर शुभम जाधवविरोधात गुन्हा दाखल
शेख याने पुणे मॅरेज ब्युरो ग्रुप समाजमाध्यमावर सुरु केला होता. या समूहाचा प्रमुख शेख होता. आरोपी शाहनवाज समाजमाध्यमातील समूहात सदस्य होता. खराडी भागातील एका तरुणीने संबंधित समूहावर विवाहाबाबत माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले होते. इम्रानने शाहनवाजचे स्थळ तरुणीला सुचविले होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी शाहनवाजला नकार दिला. त्यानंतर इम्रानने तरुणीला विवाहासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर इम्रानला नकार देण्यात आला. इम्रानने तरुणीला त्रास देण्यासाठी तिची बदनामी केली.
आरोपी इम्राने तरुणीची बदनामी केली होती. आरोपी शाहनवाजने तरुणीला त्रास देण्यासाठी राजकीय नेत्यांना खंडणी मागण्याचा कट रचला. त्याने राजकीय नेत्यांचे मोबाइल क्रमांक मिळवले. समाजमाध्यमातील दूरध्वनी सेवेचा (व्हाॅटसॲप) गैरवापर करुन त्यांनी राजकीय नेत्यांकडे प्रत्येकी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. शाहनवाजने खंडणीची रक्कम तरुणीच्या मोटारीत ठेवण्यास सांगितले. या प्रकरणात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. कोणीतरी खोडसाळपणे तरुणीला त्रास देण्यासाठी हा प्रकार करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरु केला. तेव्हा आरोपी इम्रान आणि शाहनवाज खंडणी प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे आदीनी या प्रकरणाचा तपास केला.
तरुणीच्या संपत्तीवर आरोपींचा डोळा
तरुणीची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे. कुटुंबीयांची खराडी भागात जमीन आहे. तरुणीच्या कुटुंबीयांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांनी विवाहाबाबत विचारणा केली होती. मात्र, तरुणीने दोघांना नकार दिल्याने आरोपी इम्रान आणि शाहनवाज तिच्यावर चिडले आणि राजकीय नेत्यांकडे खंडणी मागण्याचे गुन्हे केले. तरुणीला त्रास देण्यासाठी तिच्या मोटारीत खंडणीची रक्कम ठेवण्यास सांगितले.