पुण्याच्या मावळमधील कुंडमाळा येथे तरुण वाहून गेला आहे. ओमकार बाळासाहेब गायकवाड (वय- २४) वर्षे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. शुक्रवारी तो आणि त्याचा मित्र कुंडमळा परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते. तेव्हाच कुंडमाळ्याच्या बंधाऱ्यावरून चालत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा शोध मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथक घेत आहे. परंतु, अद्यापही तो मिळून आला नाही. ओमकारने वाहून जाण्यापूर्वी त्याच्या मित्रासह काही व्हिडीओ काढले होते. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आणि त्याचा मित्र हे कुंडमळा परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दुपारच्या सुमारास आले होते. काही वेळ त्यांनी कुंडमळ्यात फोटोसेशन केलं, व्हिडीओ काढले. मग दोन्ही मित्र कुंडमळ्यात पोहण्यासाठी उतरले, त्याच दरम्यान पहिला मित्र पाण्याच्या बाहेर आला. तो ओमकारला बाहेर येण्यास सांगत होता. बंधाऱ्याहून परतत असताना त्याचा पाय घसरला आणि तो वाहून गेला. तात्काळ मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाला घटनस्थळी बोलवण्यात आलं. कुंडमळ्यात वाहून गेलेल्या ओमकारचा शोध घेण्यात आला. परंतु रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज पुन्हा शोधकार्य करण्यात येणार आहे.

हेही वाचा – कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तहेराला क्षेपणास्त्रांची माहिती दिल्याचे उघड, दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

दरवर्षी याच कुंडमळ्यात वर्षाविहारासाठी आलेल्या अनेकांचा मृत्यू झालेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कुंडमाळा परिसरात पर्यटकांनी येऊ नये. स्वतःची काळजी घ्यावी, अशा आशयाचे फलक लावले आहेत. तरीही जीव मुठीत घेऊन हे पर्यटक कुंडमळा परिसरात पर्यटनासाठी येतात.

शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल…

ओमकारचा शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ओमकार वाहून जाण्याच्या अगोदर त्याचा मित्र आणि त्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये काढण्यात आले होते. तो कुंडमळ्यातील पाण्यासोबत खेळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Video-2023-07-08-at-9.25.11-AM.mp4
व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भावी नगरसेवकांची धडधड वाढली… आतापासूनच बंडाचा झेंडा हाती!

पोलिसांनी केलं आवाहन…

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी पर्यटकांना आवाहन केला आहे. की, पर्यटकांनी कुंडमाळा परिसरामध्ये पर्यटनासाठी येऊ नये, जीवघेणे पर्यटन करू नये, दरवर्षी या ठिकाणी अनेकांचा मृत्यू होतो. पोलीस बंदोबस्त असूनही पर्यटक हुल्लडबाजी करत स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी फलक लावण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक कुंडमळ्यात उतरतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth was carried away in a kundmala in the maval of pune kjp 91 ssb