हडपसर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण बोपदेव घाटात मृतावस्थेत सापडला. तरुणाचा गोळी झाडून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.गणेश मुळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रविवारी (११ डिसेंबर) घरातून बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात सोमवारी रात्री गणेशचा मृतदेह सापडला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे कारण समजू शकले नाही. हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.