पुणे : राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून ‘स्टुडंट पोर्टल’वर माहिती अद्ययावत करणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ७३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवरील माहितीशी जुळत नसल्याचे समोर आले असून, अनेक शाळांकडून सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत.

शालेय पोषण आहार, आरटीई प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक गणवेश वाटप, संचमान्यता आदींसाठी आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणीबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच नोव्हेंबर २०२२ मध्ये विशेष अभियानही राबवण्यात आले. शाळांकडून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद केल्यानंतर स्टुडंट पोर्टलवरील शाळेच्या नोंदींतील विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, लिंग ही माहिती तपासणे आवश्यक आहे. माहिती नोंद केल्यानंतर विद्यार्थ्याचा डेटा आधार प्रमाणिकरणाकडून ऑनलाइन प्रमाणित करून घेण्यात येतो. यात काही विद्यार्थ्यांची माहिती जुळत नसल्याचे आधार प्राधिकरणाकडून कळवण्यात आले आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती आणि आधार कार्डवरील माहिती जशीच्या तशी न भरली गेल्याने त्यात काही चुका झाल्याने माहिती जुळत नसल्याचे दिसून आले आहे.

Contract workers, PMRDA , mobile phones,
कंत्राटी कामगारांना कार्यालयात मोबाइल वापरण्यास बंदी, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय
Vote Counting, Traffic Change, Wakad, Hinjewadi,
पिंपरी : मतमोजणीनिमित्त उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत बदल
Kothrud Constituency, Chandrakant Patil,
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्याची चर्चा
Pune District Ladki Bahin Yojana, Pune, Ladki Bahin,
मतटक्का वाढण्यास ‘लाडक्या बहिणीं’चा हातभार?
Khadakwasla constituency, MNS, votes,
‘खडकवासल्या’चा निकाल मनसेच्या हाती
How many marks are required to pass Maths and Science in 10th standard exam
दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक? राज्य मंडळाने दिले स्पष्टीकरण…
Mahayuti candidate Shankar Jagtaps winning flex before voting result
निकलाआधीच महायुतीचे उमेदवार शंकर जगतापांचे विजयी फ्लेक्स; चर्चेला उधाण
NCP candidate MLA Anna Bansode claimed he will spread victory in Pimpri Assembly Constituency
पिंपरी: विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आमदार अण्णा बनसोडे यांचा दावा
Hadapsar constituency highest number of voters in Pune recorded lowest turnout
सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात झाली ‘ही’ स्थिती! झोपडपट्टी परिसरातील मतदान केंद्रांवर सायंकाळनंतर रांगा

हेही वाचा – कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये कोयता गॅंगकडून १५ वाहनांची तोडफोड; वर्चस्वाच्या वादातून गुंडांचा हल्ला

हेही वाचा – पुणे : महावितरणच्या कामशेत शाखेचे सहायक अभियंता निलंबित

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील २ कोटी १३ लाख ७९ हजार २५८ विद्यार्थ्यांपैकी २ कोटी ९ लाख ४६ हजार ७० विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली आहे. ४ लाख ३३ हजार १८८ विद्यार्थी आधार नोंदणीविना आहेत. १ कोटी ७८ लाख १२ हजार ८१२ विद्यार्थ्यांची आधार प्रक्रिया करण्यात आली. त्यातील १ कोटी ३५ लाख ६५ हजार ७२७ विद्यार्थ्यांची आधार कार्डवरील माहिती वैध ठरली. तर ७३ लाख ८० हजार ३४३ विद्यार्थ्यांची माहिती अवैध ठरल्याचे आणि माहिती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.