दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (डिक्की) या संघटनेच्या कार्यालयाला प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने रविवारी भेट देऊन ‘डिक्की’च्या कामाचे कौतुक केले.
आमिर खान विविध कार्यक्रमांसाठी रविवारी पुण्यामध्ये आला होता. त्यावेळी ‘डिक्की’च्या कार्यालयाला आमिरने भेट दिली. ‘डिक्की’च्या उद्योजकांची, त्यांच्या व्यवसायांची, ‘डिक्की’च्या विविध उपक्रमांची आमिरने माहिती घेतली. दलित समाजामध्ये उद्योगतेचा विचार रुजवण्यासाठी डिक्कीने केलेल्या कामाचे आमिर याने कौतुक केले. ‘देशाच्या सर्वागीण विकासासाठी सर्व समाजाचा विकास होणे गरजेचे आहे. सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत आमिर याने यावेळी व्यक्त केले. ‘डिक्की’ करत असलेल्या कामामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन आमिर याने या वेळी दिले.
या वेळी ‘डिक्की’ चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, स्वप्नील भिंगारदिवे, अविनाश जगताप, राजेंद्र गायकवाड, देवानंद लोंढे, स्नेहल लोंढे, मनोज गायकवाड, अनिल सौंदाडे, सीमा कांबळे, मैत्रेयी कांबळे, सुशील कदम, प्रसाद दहापुते आदी उपस्थित होते.

Story img Loader