महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे दिले जाणारे ‘नरुभाऊ लिमये स्मृती- आर्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाले असून, सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांला दिला जाणारा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांना, तर ज्येष्ठ पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार दैनिक ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना जाहीर झाला आहे.
यावर्षी सोळावे पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. हे पुरस्कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभ २ जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे दुपारी २ वाजता होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे आणि खासदार वंदना चव्हाण या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी दिली.
अप्पासाहेब राजळे, कुवळेकर यांना यंदाचे ‘आर्यभूषण’ पुरस्कार जाहीर
‘नरुभाऊ लिमये स्मृती- आर्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाले असून, अप्पासाहेब राजळे यांना, तर ज्येष्ठ पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार विजय कुवळेकर यांना जाहीर झाला आहे.
First published on: 29-06-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaryabhushan reward declared to rajale and kuwalekar