‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबईत होणाऱ्या  महाअंतिम फेरीसाठी पुणे विभागातून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘आशा’, तर नाशिक विभागातून ‘हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालया’च्या ‘चलो सफर करे’ या एकांकिकेची निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे व नाशिक विभागाची अंतिम फेरी मंगळवारी रात्री संपली. पुणे विभागात सहा, तर नाशिक विभागात चार एकांकिकांनी विभागीय अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

‘आशा’ला सर्वाधिक पारितोषिके

पुणे विभागीय अंतिम फेरीत सहा वैयक्तिक पारितोषिकांसह फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘आशा’ या एकांकिकेने बाजी मारत सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. अंतिम फेरीत ‘आशा’ ही एकांकिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय स्त्री आणि पुरुष, नेपथ्य, संगीत या वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

नाशिक विभागातून ‘चलो सफर करे’

शहरी आणि ग्रामीण भागांतील जीवनात असलेल्या दरीचे दर्शन घडवितानाच पैशांपुढे रक्ताचे नातेही किती तकलादू ठरते, हे मांडणारी हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयाची ‘चलो सफर करे’ ही एकांकिका नाशिक विभागातून महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. महाअंतिम फेरी शनिवारी १५ डिसेंबर रोजी मुंबईत रंगणार आहे.

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून, ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.