हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘डॉ. अब्दुल कलाम बुक बँक’ उपक्रमाचे यश
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचीच नाही तर नावीन्यपूर्ण वाचनाची गोडी लावून त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यात ‘डॉ. अब्दुल कलाम बुक बँक’ या उपक्रमाला यश आले आहे. महापालिकेच्या २० शाळांतील २४ हजार विद्यार्थ्यांना पुस्तक वाचन उपक्रमाचा लाभ झाला असून त्यांचा आत्मविश्वासही वाचनामुळे दुणावला आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘मिसाइल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे मुलांचे लाडके व्यक्तिमत्त्व. राष्ट्रपतिपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवून कोणत्याही कार्यक्रमात शालेय मुलांना भेटून ते मुलांशी गप्पा मारण्यामध्ये रमत. या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी या उद्देशातून पुण्यातील पं. दीनदयाळ सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन डॉ. अब्दुल कलाम बुक बँक हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेतच मोकळ्या वेळेत (ऑफ तास) वाचन करता यावे यासाठी ‘डॉ. अब्दुल कलाम बुक बँक’ ही फिरती पुस्तक पेटी योजना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली. या अभिनव उपक्रमांतर्गत शिक्षण मंडळाच्या २० शाळांतील किमान २४ हजार विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी काळात या योजनेची व्याप्ती वाढविताना शाळांच्या संख्येमध्येही भर पडणार आहे.
या उपक्रमामध्ये शाळांतील मुलांचे अभ्यासेतर वाचन वाढविण्यासाठी विज्ञान, कला, संस्कृती या विषयांवरील गोष्टीरूप, थोर नेते आणि राष्ट्रपुरुष यांची चरित्रे, प्रवासवर्णन, इतिहास अशा विविध विषयांची किमान ७० ते १०० पुस्तके एका पेटीमध्ये ठेवून ती पेटी प्रत्येक शाळेला दिली जाते, अशी माहिती या उपक्रमाचे प्रवर्तक प्रा. विनायक आंबेकर यांनी दिली. मार्चमध्ये विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या १२ शाळांना आणि ऑगस्टमध्ये सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या १० शाळांना ही पेटी देण्यात आली आहे. एका शाळेमध्ये ही पेटी तीन महिने ठेवली जाते.
मुलांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ
या उपक्रमाची उपयोगिता तपासण्याच्या उद्देशातून शिक्षण मंडळाच्या तीन शाळांमध्ये ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांनी वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकाविषयी पाच मिनिटांत मनोगत व्यक्त केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते उत्तम वक्तृत्व कौशल्य दाखविणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली, असे प्रा. विनायक आंबेकर यांनी सांगितले.