अभय छाजेड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभय छाजेड हे सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले असून त्यांनी स्थायी समिती, शहर सुधारणा समिती आणि नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
महापालिकेची २००२ मधील प्रभाग पद्धतीची निवडणूक होती. त्या वेळी महापालिका आयुक्त असलेले अरुण भाटिया यांना शासनाच्या सेवेत परत पाठविल्याचा मुद्दा गाजत होता. याच काळातील या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी एका घरामध्ये गेलो होतो. ‘तुम्ही भाटिया यांच्यासारख्या चांगल्या माणसाला काढून टाकले. मग आम्ही तुम्हाला मतदान का करायचे?’, अशा प्रश्नातून त्या घरातील ज्येष्ठ नागरिकाने जणू मला खडसावलेच होते. मग, मी त्यांना यामागचे कारण माहीत आहे का, असे विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले. महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी बोलावले म्हणून मी पोलीस चौकीत गेलो होतो. तर, ‘तुम्ही कर्मचाऱ्याचे वकील म्हणून गेला होता’, असा आरोप ठेवून अरुण भाटिया यांनी माझे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आणला होता. नगरसेवक म्हणून मी कोठे जावे हे जर आयुक्त ठरविणार असतील, तर आमचे अधिकार राबवायचे कसे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता.
महापालिकेच्या सर्व सभासदांनी एकमताने ठराव संमत करून भाटिया यांना शासनाच्या सेवेत परत बोलविण्याची विनंती केली होती. हा सर्व घटनाक्रम मी सांगितला आणि आमचे काय चुकले, असे त्या काकांना विचारले. ज्येष्ठ नागरिकाच्या शंकेचे निरसन झाले तेव्हा ‘मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन आम्ही तुम्हालाच मत देऊ’, असे आश्वासन त्यांनी मला दिले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे मी अनुभवले. मी १९८५ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. त्या वेळी अवघ्या ७० मतांनी ना. तु. पवार यांना विजय मिळाला होता. सन १९९२ मध्ये काँगेसने मला तिकीट दिले होते. मात्र, त्या वेळी पक्षात आलेल्या छगन भुजबळ यांनी या जागेसाठी विलास भुजबळ यांच्यासाठी आग्रह धरला आणि ऐनवेळी माझ्याऐवजी विलास भुजबळ यांना तिकीट देण्यात आले. मग, मी अपक्ष लढून विजय संपादन केला. त्यानंतर १९९७, २००२, २००७ आणि २०१२ अशा सलग चार वेळा मी विजय संपादन केला आहे.महापालिकेच्या स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, नियोजन समिती अशा विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषविले. सर्वसाधारण जागेवरून सलग पाच वेळा निवडून येणारा मी महापालिकेतील एकमेव सदस्य आहे.
पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा महर्षीनगर येथील संत नामदेव शाळा ही एका चाळीत भरत असे. मी ही शाळा बांधून दिली. या कामाविषयी मला कृतज्ञता वाटते. त्या शाळेतील एक शिक्षिका माझ्या भगिनीच झाल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीला ‘फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून एक पाकीट देतात. एरवी भाऊबीजेला आपण बहिणीला ओवाळणी देतो. पण, ही भगिनी मला निवडणुकीच्यावेळी ही प्रेमाची भेट देत असते.