पीएमपीच्या ‘अभि’ विमानतळ बससेवेची प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने या बससेवेच्या तिकीट दरात फेररचना करण्यात आली आहे. बससेवा आता नियमित तिकीट दरात ठेवण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.पीएमपीच्या वतीने अभि (एअरपोर्ट बस फाॅर बिझनेस ॲण्ड हाॅटेल इंटरकनेक्टिव्हिटी- अभि) सेवा सुरू करण्यात आली आहे. लोहगाव विमानतळावरून सहा विविध मार्गांवर स्मार्ट वातानुकूलित गाड्यांद्वारे ही सेवा पुरविली जात आहे. अभि विमानतळ बससेवेचे मार्ग बिझनेस आणि हाॅटेल इंटर कनेटिव्हिटीच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या बससेवेसाठी विशेष तिकीट दर आकारण्यात येत होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचा त्याला प्रतिसाद मिळत नव्हता तसेच पीएमपीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम दिसून येत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार ; हडपसर भागातील घटना

या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सध्या प्रचलित असलेल्या तिकीट दराची फेररचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोळा डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर अभि बससेवेच्या सहा मार्गांवर नियमित दराने तिकीट आकारणी होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: जि. प. कर्मचाऱ्यांच्या मुलांचे उन्हाळी शिबिर साडेपाच लाखांचे; करोना काळात कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून खर्च

हिंजवडी माण फेज-३ ते विमानतळ, भेकराईनगर (हडपसर) ते विमानतळ, स्वारगेट ते विमानतळ, कोथरूड स्थानक ते विमानतळ, निगडी ते विमानतळ (चिंचवड स्थानक, नाशिक फाटा, लांडेवाडी काॅर्नर, भोसरी, विश्रांतवाडी मार्गे) आणि निगडी ते विमानतळ (चिंचवड स्थानक, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे रेल्वे स्थानक, शास्त्रीनगर रस्ता, हयात हाॅटेल मार्गे) या सहा मार्गांवर पीएमपीच्या एकूण ६२ फेऱ्या होतात. यापूर्वी अभि बससेवेच्या गाड्यांना ठरावीक थांबे देण्यात आले होते. मात्र आता नियमित दर आकारणी होणार असल्याने या गाड्या सर्व थांब्यांवर थांबणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.