पुणे : झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले. कारवाई टाळण्यासाठी सराइत पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात असलेल्या डोंगररांगात वास्तव्य करत होता. तेथील एका मंदिरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

शुभम संजय धुमाळ (वय २३, रा. धुमाळ मळा, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे ताब्यात घेण्यत आलेल्या सराइताचे नाव आहे. त्याला अटक करुन एक वर्षांसाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. धुमाळ याच्याविरोधात लोणी काळभोरसह विविध पोलिस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे लोणी काळभोर पोलिसांनी त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ पाचचे तत्कालीन पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी त्याला जुलै २०२४ मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार केल्यानंतर तो आदेशाचा भंग करुन लोणी काळभोर परिसरात येत होता. त्यामुळे त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची गरज असल्याने पोलिसांनी ‘एमपीडीए’ कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.

Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Shocking video 4 thousand people Resume For 50 Jobs In Pune Video Viralon social media
“बापरे अवघड आहे तरुणांचं” तुम्हीही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय? हा VIDEO पाहून धक्का बसेल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Teacher gets 5 years in jail for molesting girls
अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला सक्तमजुरी
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर केला. एमपीडीए कारवाईची माहिती मिळताच शुभम फरार झाला होता. त्याने मोबाइल संच वापरणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. फरार झाल्यानंतर तो गंभीर गुन्हा करण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. तो म्हातोबाची आळंदीजवळ असलेल्या डोंगरातील गवळेश्वर मंदिरात लपून बसल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रवानगी नाशिक कारागृहात रवानगी केली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader