पुणे : जेजुरीतील माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. वनीस प्रल्हाद परदेशी (सध्या रा. गुरुवार पेठ, पुणे, मूळ रा. ढालेवाडी, बेंदवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे), महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी (वय ६५, सध्या रा. ढालेवाडी, बेंदवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> टोमॅटोचा भाव विचारल्याने पुण्यात ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये हाणामारी

जमिनीच्या वादातून जेजुरीतील माजी नगरसेवक महेबूब सय्यदलाल पानसरे यांच्यावर कुऱ्हाड, तसेच कोयत्याने वार करुन खून केल्याची ढालेवाडीत घडली. या प्रकरणी परदेशी यांच्यासह साथीदारांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेले आरोपी वनीस आणि महादेव परदेशी शहरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सुरेंद्र जगदाळे, इश्वर आंधळे, शंकर संपते, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदीप गाडे, पवन भोसले आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absconding accused in jejuri former ncp corporator murder case arrested by crime branch pune print news rbk 25 zws
Show comments