अमली पदार्थ विक्री प्रकरणात गेले वर्षभर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मार्केट यार्ड परिसरात पकडले. त्याच्याकडून मोटार, अमली पदार्थ असा सहा लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आसिफ पटेल असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथक गस्त घालत होते. मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात पटेल थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

हेही वाचा >>>मोकाट श्वान, पुणेकर हैराण ! ; श्वानांच्या संख्येबाबत महापालिका अनभिज्ञ

त्याच्या मोटारीची पाहणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत सहा ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत ९० हजार रुपये आहे. पटेलकडून मेफेड्रोन, मोटार जप्त करण्यात आली.गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader