लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाने अत्याचार केले. तसेच मोबाइलवर चित्रीकरण करून त्याद्वारे तिला धमकावून ३० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तरुणासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-पुणे: गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याला पकडले

या बाबत एका १९ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणासह त्याची आई, वडील, मावस बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणी नातेवाईक आहेत. ती मुलगी अल्पवयीन असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. तिची छायाचित्रे मोबाइलवर काढली. याबाबत तिने तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली होती. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत अत्याचार केले. तरुणीने घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले, तसेच मुदतठेव मोडून ३० लाख रुपये रक्कम जमा केली. ही रक्कम तिने तरुणाच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानंतर आरोपी तरुण तिला धमकावत होता. त्याच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abuse of a minor girl by a relative pune print news rbk 25 mrj
Show comments