पिंपरी : साखरपुड्यानंतर लैंगिक अत्याचार करुन पाच लाख रुपये घेतले आणि संशय घेवून पैसे घेण्याकरिताच लग्न जमविल्याचे सांगत लग्नास नकार दिल्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार कुणाल संतोष चौधरी, त्याचे वडील संतोष चौधरी (दोघे रा. गंजपेठ, पुणे) यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी कुणाल यांचा २ एप्रिल २०२२ रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर आरोपी कुणालने फिर्यादीला महाबळेश्वर येथे नेत अत्याचार केला. तसेच मे, जून मध्येही लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. आरोपींनी तरुणीचा विश्वास संपादन केला. कुणालने शेअर मार्केटसाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी फिर्यादीला कर्ज काढण्यास भाग पाडले.

हेही वाचा >>> कोथरुडमध्ये कचरावेचक महिलेला मारहाण करुन अंगावर पाळीव श्वान सोडले; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा

फिर्यादीकडून पाच लाख २२ हजार रुपये घेतले. त्यानंतर किरकोळ कारणावरुन भांडणे करत पैसे देण्यास नकार दिला. फिर्यादीवर संशय घेवून तुझ्याकडून पैसे घेण्याकरीताच लग्न जमवले होते. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. जर पैसे मागायला आली. तर, तुला व तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abuse young woman after engagement fraud five lakhs and refusal of marriage pune print news ggy 03 ysh
Show comments