ललित कला केंद्र आणि अभविप आमनेसामने
मागील काही महिन्यापासून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहत आले आहे.तर आज सायंकाळच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत,या नाटकाचा प्रयोग उधळून लावला.
हेही वाचा >>> पुणे लोकसभेसाठी मनसेच्या उमेदवारांचा अहवाल तयार… जाणून घ्या कोण आहेत संभाव्य उमेदवार
या नाटकाच्या विरोधात अभविपकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घटनेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रण आणण्यात आली. या घटनेबाबत अभाविप प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तर्फे रामलीला नाटक आयोजित केले होते. या नाटकामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचे दिसले. याचा विरोध केल्यावर अभाविप च्या कार्यकर्त्यांवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा अभाविप तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि यामध्ये सहभागी असणार्याआ सर्व प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.