पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी किशोर बाबुराव शिंगे यांना सोमवारी दुपारी एसीबीच्या पथकाने लाच घेताना अटक केली. श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यावरील ही पहिली कारवाई नाही. याआधी एसीबीच्या पथकाने २० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट कारवाई करून लेखा अधिकारी किशोर शिंगे यांना बेड्या ठोकल्या. या अधिकाऱ्याने एका ठेकेदाराकडून फाईल क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. संबंधित ठेकेदाराच्या भाचाने याप्रकरणी अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या लेखाधिकाऱ्याने एक हजार रुपयांची मागणी केली होती. एसबीच्या पथकाने सोमवारी महापालिकेत सापळा रचून एक हजार रुपयांची लाच घेताना शिंगे यांना हातोहात पकडले. महापालिकेच्या इतिहासात आज पर्यंत २१ कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात सर्वच काही अलबेल नाही.