Accident News : देशभरात दररोज अनेक अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अपघाताची घटना घडल्यानंतर लवकर मदत देखील मिळत नाही. तसेच अनेकदा भीषण अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही अपघाताच्या घटनांचे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका कार अपघातामधून बचावलेल्या एका महिलेने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे. २० सप्टेंबर २०२४ रोजी अनुपमा सिंग या मुंबईहून पुण्याला परतत होत्या. तेव्हा दुपारी २.४५ च्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्यात त्यांच्या बीएमडब्ल्यू कारला अपघात झाला. त्यांची कार एका ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली.

त्यानंतर अनुपमा सिंग यांना त्यांच्या गाडीच्या चालकाने आवाज देत मागच्या सीटवरून बाहेर येण्याची विनंती केली. मात्र, त्या गाडीच्या एअरबॅगमुळे अड़कल्या होत्या. त्यामुळे गाडीच्या बाहेर येण्यास त्यांना अडचण निर्माण होत होती. मात्र, त्यांची गाडी रस्त्याच्या मधल्या लेनमध्ये असल्यामुळे दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या गाड्यांना त्यांचा ड्रायव्हर थांबवण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून त्यांना काही मदत होईल. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पुण्यातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने मदत केली. त्या व्यक्तीच्या आणि ड्रायव्हरच्या मदतीने सिंग यांना गाडीच्या बाहेर फूटपाथवर आणलं.

Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

या अपघातात बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला होता. तर ज्या ट्रकमुळे अपघात झाला तो ट्रक त्या ठिकाणांहून गायब झाला होता. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. आमच्या गाडीच्या ड्रायव्हर जवळपास अर्धा तास मदत मागत होता. पण कोणीही गाडी थांबली नाही आणि मदत केली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत तब्बल ४० ते ४५ मिनिटांनंतर एक ट्रक आणि एक रुग्णवाहिका घेऊन पोलिसांची गाडी आली. तेव्हा आमची चक्काचूर झालेली बीएमडब्ल्यू कार पाहून त्यांनी म्हटलं की तुमचं नशीब, आभार मानले पाहिजेत. कारण तुम्ही जिवंत राहिलात, असा असा थराराक अनुभव अनुपमा सिंग यांनी सांगितला. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, सिंग यांना ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यासाठी बसवण्यात आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये नर्स किंवा डॉक्टर कोणीही नव्हतं. मला हे पाहून आश्चर्य वाटलं की रुग्णवाहिकेत फक्त ड्रायव्हर होता. आरोग्य सेवेच्या संदर्भात कोणीही कर्मचारी नव्हता. शिवाय रुग्णवाहीका जवळजवळ रिकामी होती. तसेच ड्रायव्हरने माझ्या बोटावर ऑक्सिमीटर ठेवलं आणि नंतर सांगितलं की माझी नाडी जास्त आहे. जे आश्चर्यकारक वाटल्याचं सिंग यांनी सांगितलं. दरम्यान, त्यानंतर पुण्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार घेण्यात आले. त्यानंतर दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही अनेक दिवस नीट चालता आले नाही. मात्र, अशा प्रकारच्या अपघाताच्या घटनात तात्काळ मदत मिळत नाही ही दुर्देवी गोष्ट आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader