पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी एकच्या सुमारास खोपोली एक्झिट येथे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीविहितहानी झालेली नाही. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटून किंवा ब्रेक निकामी झाले, त्यानंतर या ट्रकची वाहनांना धडक बसली असावी असाही एक प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बोरघाटात तीव्र उतारावर ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, अपघातग्रस्त सामाजिक संस्था घटनस्थळी पोहचल्या.
First published on: 27-04-2023 at 15:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident at pune mumbai expressway near khopoli exit 11 to 12 vehicles collided with each other kjp 91 asj