पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव मोटार ट्रकवर आदळून चौघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.सुबोध प्रशांत पाटील, सारंग प्रशांत पाटील, श्वेता सुबोध पाटील, अंकिता सारंग पाटील (चौघे सध्या रा. बदलापूर, ठाणे, मूळ रा. बुऱ्हानपूर, मध्य प्रदेश) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे : पिंपरीत १४ वर्षांपूर्वी अनैतिक संबंधातून मैत्रिणीची हत्या करणारा आरोपी जेरबंद

या प्रकरणी पोलिसांनी टँकरचालक ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय २७, रा. लोणी काळभोर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबीय सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरातील रोपवाटिका पाहण्यासाठी शनिवारी सकाळी निघाले होते. त्या वेळी लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्ती परिसरात भरधाव मोटारीने टँकरला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर लोणी काळभोर पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत चौघे जण अडकले होते. मोटारीत आठ महिन्यांचे बालक होते. सुदैवाने बालकाला दुखापत झाली नाही. पोलिसांनी कटरच्या साहाय्याने मोटारीचा पत्रा कापून चौघांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले.