नारायणगाव : जुन्नर  तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत . हा अपघात शुक्रवारी ( दि. ०७ ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत आळेफाटा पोलिसांनी कडुन मिळालेल्या माहितीनुसार , पुणे -नाशिक महामार्गावर असलेल्या आळेफाटा गावच्या हद्दीत ट्रक पुणे दिशेने जाणारा ट्रक (जी.के.२७ टी.एफ.१०६३) जात असताना पुणे कडे जाणारया खाजगी बस ट्रॅव्हल्स (एम.एच.१८ बीजी २५०० ) या बसच्या चालकाला  पुढे असलेल्या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने पाठीमागून बस कंटेनर वर जाऊन जोरात आदळली . या अपघातात बस मधील १) सबाब पिंजारी वय 35 वर्षे रा. चोपडा जळगाव,२) कल्पना अशोक अहिरराव वय ५८ वर्षे ३) योगेश अशोक अहिराव वय ३५  ४) अशोक तुकाराम अहीरराव वय ६६ सर्व रा. राजगुरूनर , खेड ५) हर्षा प्रशांत माळी वय २५वर्षे रा. भोसरी ६) सोनल पिराचंद शाहा वय 34 रा.भोसरी ७) राजेश्वरी सुरेंद्र पाटिल वय २४ रा. चिंचवडी हे जखमी झाले आहेत . त्यांना आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(अपघातातील बस)